घरमहाराष्ट्रपिंपरीत व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

पिंपरीत व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

Subscribe

पिंपरी - चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धोत्रे हे ज्योती टूर्स अँड ट्रव्हर्लसचे व्यवसायिक होते. लुटण्याच्या उद्देशाने हा हल्ला चढवला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राहटणी येथे राहणाऱ्या एका व्यावसायकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिलकुमार रघुनाथराव धोत्रे (४४) असे या व्यावसायिकाचे नाव असून यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात टूर्स अँड ट्रव्हर्लसचे कार्यालय आहे. चोरट्यांनी लूट करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हा हल्ला चढवला असून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पिंजन हे करत आहेत.

नेमके काय घडले?

पिंपरी – चिंचवडमधील प्रभात कॉलनी रोड परिसरात अनिलकुमार रघुनाथराव धोत्रे हे व्यावसायिक राहायचे. धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रव्हर्लसचा व्यवसाय होता. ते दररोज घरी जाताना पैसे घेऊन जायचे. त्यांच्याकडे दररोज रात्री निघताना तब्बल एक ते दोन लाख रुपयांची रक्कम असायची.

- Advertisement -

सोमवारी देखील ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन निघाले होते. धोत्रे यांनी त्यांच्याजवळील काळ्या बॅगेतून एक लाख ९६ हजार रुपये ठेवत ते निघाले. ते घराच्या मार्गाने जात असताना अचानक दुचाकीवरुन येणाऱ्या एका हल्लेखोरांने त्यांच्या हातातील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. धोत्रे आणि त्या हल्लेखोर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अखेर धोत्रे यांनी प्रतिकार केल्याने हल्लेखोरांनी आपल्या जवळील पिस्तूल काढून धोत्रेंवर गोळ्या झाडल्या. अखेर हल्ल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -