घरदेश-विदेशसीएए हा भारताचा अंतर्गत मुद्दा; त्यावर चर्चा नाही

सीएए हा भारताचा अंतर्गत मुद्दा; त्यावर चर्चा नाही

Subscribe

डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पष्टीकरण

सीएए हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नाही, असे सांगत अभूतपूर्व स्वागतासाठी त्यांनी भारतीयांचे आभार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यात भारत, अमेरिकादरम्यान तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणार्‍या दहशतवादाला लगाम घालणे आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. सीएएविरोधातील हिंसाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचाराबाबत आपण ऐकलंय. पण प्रकरणी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली नाही.

- Advertisement -

सीएएवर आपण बोलणार नाही कारण हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. अपेक्षा आहे भारत योग्य पाऊल उचलेल आणि योग्य निर्णय घेईल. आम्ही मोदींशी धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा केली. धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, अशीच मोदींची ईच्छा आहे. भारताने धार्मिक स्वातंत्र्यावर मोठे काम केले आहे. नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित आहे. भारतात सध्या २० कोटी मुस्लिम आहेत. काही वर्षांपूर्वी मुस्लिमांची संख्या १४ कोटी इतकी होती. आम्ही मुस्लिम समाजालासोबत घेऊन काम करतोय, असे मोदींनी सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले.

भारत आणि अमेरिकेदरम्यान तीन अब्ज डॉलर (21559350000000 रुपये)च्या संरक्षण करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. ज्यात अमेरिकेचे 23 एमएच 60 रोमियो हेलिकॉप्टर आणि सहा एएच 64ई अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांमध्ये संरक्षण संबंध आणखी मजबूत होणार आहेत. अमेरिकेकडून घेण्यात येणारे दोन्ही प्रकारची ही हेलिकॉप्टर्स कोणत्याही मोसमात शत्रूवर हल्ला करण्यात सक्षम आहेत. चौथ्या पिढीचे हे हेलिकॉप्टर समुद्रातील पाणबुडीलाही अचूक लक्ष्य करून तिचा नेस्तनाबूत करू शकते.

- Advertisement -

तर यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या वाणिज्य मंत्र्यांनी व्यापारसंबंधी सकारात्मक चर्चा केली आहे. आम्ही दोघांनीही ठरवले आहे की, आपापल्या देशांच्या टीमने या व्यापार चर्चेला अंतिम स्वरूप द्यावे. आम्ही एका मोठ्या व्यापार करारावरही चर्चा करण्यास सहमत आहोत. जागतिक स्तरावर आमचे संबंध समान लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत.

रिझर्व्ह बँकेने दिलेला नोटा छपाईचा कोटा पूर्ण

यंदाही नोटांची छपाई ९५ टक्के पूर्ण झाल्याचे समजते, काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कामगारांबरोबरच प्रशासनही प्रयत्नशील आहे.

रिझर्व्ह बँकेने करन्सी नोट प्रेस प्रशासनाला दिलेले टार्गेट कामगारांनी वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. नोटा छपाईचे काम अंतिम टप्प्यात असून मार्च २०२० अखेर उर्वरीत काम पूर्ण होईल.
– जगदीश गोडसे, जनरल सेक्रेटरी, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -