घरताज्या घडामोडीCoronavirus: प्रवाशांनो आता रेल्वेत स्वत:च घेऊन या ब्लँकेट

Coronavirus: प्रवाशांनो आता रेल्वेत स्वत:च घेऊन या ब्लँकेट

Subscribe

करोनाच्या धास्तीमुळे  रेल्वे घेतला मोठा निर्णय  खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सोयी बंद

चिनमध्ये हाहाकार माजविण्यारा करोना व्हायरस आता भारतासह महाराष्ट्रात शिरला आहे. या करोना व्हायरसचा मोठा धोका रेल्वेला असून रेल्वे प्रशासनाने करोना व्हायरस पसरु नये यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता लांब पल्ल्याच्या गाडयातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चादरी आणि ब्लँकेट बंद करण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना स्वत: ब्लँकेट आणि चादरी आणाव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईत करोना व्हायरसने शिरकाव केल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.  प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे हेरिटेज वस्तू संग्रहालय ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर हेरिजेट इमारतीत पर्यटकांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने युध्दस्तरावर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.आता तर चक्क रेल्वेत प्रवाशांचा सुविधेवर सुध्दा बंदी आणली आहे. शनिवारी उशीरा पश्चिम रेल्वेने आपल्या सहा विभागात लांब पल्ल्याच्या गाडयांत प्रवाशांना देण्यात येणारे ब्लँकेट आणि चादरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरस पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -