घरमहाराष्ट्रइंदोरीकर महाराजांविरोधात खटला दाखल

इंदोरीकर महाराजांविरोधात खटला दाखल

Subscribe

पुत्रप्राप्तीचा मंत्र आपल्या किर्तनातून देणार्‍या निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर आरोग्य विभागाकडून न्यायालायात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २६ जूनला इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात सुनावणी होणार आहे.

पुत्रप्राप्तीचा मंत्र आपल्या कीर्तनातून देणार्‍या निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर आरोग्य विभागाकडून न्यायालायात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात सुनावणी होणार आहे.

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होते’ हे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून वेळोवेळी केले होते. इंदोेरीकर महाराज यांनी त्यांच्या संगमनेर व उरणमधील कीर्तनामध्ये या वक्तव्याचा उल्लेख केल्यासंदर्भात बातमी ‘आपलं महानगर’मध्ये प्रथम प्रसिद्ध करण्यात आली होती. आपल्या बिनधास्त कीर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदोरीकर महाराज यांचे हे वक्तव्य गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या समुचित प्राधिकार्‍यांकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली. परंतु सुरुवातीला इंदोरीकर महाराज यांनी आपले हे विधान काही प्राचीन ग्रंथामधील असल्याचे सांगत आक्रमक पवित्रा घेतला. मात्र पुत्रप्राप्तीचा संदेश, सल्ला किंवा जाहिरात करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याचे सिद्ध झाल्याने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार संगमनेरच्या ग्रामीण हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्याकडून इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेर प्रथम न्यायदंडाधिकार्‍यांकडे 19 जूनला खटला दाखल करण्यात आला. इंदोरीकर महाराजांविरोधातील पहिली सुनावणी 26 जूनला होणार आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे खटला दाखल होण्यास विलंब

इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानानंतर संगमनेर आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या समुचित प्राधिकार्‍यांनी यासंदर्भातील योग्य पुरावे जमा करून न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केले होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अखेर लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर संगमनेर ग्रामीण हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षकांकडून तीन महिन्यांनंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -