घरदेश-विदेशचिदंबरम यांच्या घरी सीबीआय, ईडीचे पथक नोकरांची चौकशी

चिदंबरम यांच्या घरी सीबीआय, ईडीचे पथक नोकरांची चौकशी

Subscribe

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. यानंतर तात्काळ चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, चिदंबरम यांच्या घरी ईडी आणि सीबीआयचे पथक मंगळवारी रात्री दाखल झाले. त्यांनी चिदंबरम यांच्या नोकरांची चौकशी केली. चिदंबरम यांना अटक करण्यासाठी ईडी, सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहचले होते. मात्र चिदंबरम घरी नसल्यामुळे हे पथक नोकरांची चौकशी करून माघारी परतल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

दिल्ली हायकोर्टात पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास (अंमलबजावणी संचालनालय) ईडी आणि (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआयनं विरोध दर्शवला होता. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे ईडी आणि सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे.

हे प्रकरण २००७ मधील असून त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. सीबीआयने १५ मे २०१७ साली आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती यांना देखील अटक केली होती. सध्या कार्ती चिदंबरम जामिनावर आहेत. मात्र, आज दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते,याकडे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -