घरमहाराष्ट्रकर्जत ते लोणावळा मार्गावर सीसीटीव्हीची नजर

कर्जत ते लोणावळा मार्गावर सीसीटीव्हीची नजर

Subscribe

कर्जत ते लोणावळा रेल्वे वाहतूक मार्गावर तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या लोणावळा ते कर्जत स्थानका दरम्यान पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे अनेक वेळा रेल्वे सेवा ठप्प होते. अशावेळी प्रवाशांचे हाल होतात आणि प्रवाशांची पायपीट देखील होते. त्यावर खबरदारी उपाय म्हणून मध्य रेल्वेने कर्जत ते लोणावळा घाट मार्गांवर तब्बल शंभर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील तीन सीसीटीव्ही मंकी हिल ते ठाकुरवाडी दरम्यान शनिवारपासून कार्यरत करण्यात आले आहेत.

सप्टेंबर महिन्यापर्यंत १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

घाट माथ्यावरून दरड कोसळून रेल्वे रुळावर पडलेल्या दरडीमुळे मेल-एक्सप्रेस गाडयांची सेवा दोन दिवस ठप्प होते. मोटरमनकडून घटना समजल्यानंतर त्या ठिकाणी मदतकार्य पोहोचण्यासही उशीर होतो. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून याठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यासाठी रेल्वेकडून असुरक्षित आणि धोकादायक ठिकाणांची माहिती घेतली जात होती. अखेर लोणावळा ते कर्जतदरम्यान २० ठिकाणी सीसीटीव्हीसाठी निश्चित केली गेली आहेत.

- Advertisement -

या सर्व ठिकाणी रुळांजवळ येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. तर रुळांवर दरड कोसळण्याची घटना रात्रीच्या वेळीही घडल्यास तेही कॅमेऱ्यात टिपू शकणार आहे, अशी व्यवस्था आहे. दरम्यान रुळांजवळच काही अंतरावर असलेल्या अभियंता विभागाच्या छोटया कार्यालयात सीसीटीव्हींचे नियंत्रण असेल. त्याद्वारे रुळांजवळ घडणाऱ्या घडामोडी किंवा घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. दरड कोसळत असल्याचं दिसताच तात्काळ मदतकार्य पोहोचवणे शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -