घरताज्या घडामोडीकर्करोगाच्या रूग्णांसाठी रेल्वेमार्फत 'एक्सप्रेस' होम डिलिव्हरी... 

कर्करोगाच्या रूग्णांसाठी रेल्वेमार्फत ‘एक्सप्रेस’ होम डिलिव्हरी… 

Subscribe

लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेने आपल्या मालवाहतूकीच्या सहाय्याने  कर्करोगाच्या रुग्णांना औषधांचा पुरवठा घरपोच करून आतापर्यंत आठ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी भारतीय रेल्वेच्या पार्सल आणि मालगाड्या सुरु आहे. मात्र या लॉकडाऊन काळात गावं खेळ्यात असलेल्या कर्करोगाच्या रुग्णां औषध संपली होती. त्यामुळे औषधांचा मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी ट्विटरच्या सहाय्याने रेल्वेला मदत मागितली होती. या संकटकाळत मध्य रेल्वेने आपल्या मालवाहतूकीच्या सहाय्याने अशा  रुग्णांना औषधांचा पुरवठा घरपोच करून आतापर्यंत आठ कर्करोगाच्या रुग्णांचे प्राण वाचवले आहे.

अनेकांना घरपोच औषधींचा पुरवठा

मध्य रेल्वेने कोरोना महामारीच्या काळात जलद गतीने औषधे पोहोचवून भारतभरात 8 हून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा दिला आहे. नुकतेच बेळगाव येथे रक्ताचा कर्क रोग असलेल्या रूग्णांसाठी रेल्वेच्या चार वेगवेगळ्या टप्प्यातून मुंबईतून औषधे घरी पोहचविण्यात आले आहे. कोरोना काळात अनेक रूग्ण त्यांच्या घरी अडकून पडले आणि कर्करोगाच्या रूग्णांना अत्यावश्यक औषधांची अत्यंत गरज होती. अलीकडेच बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने मुंबईहून औषधांची आवश्यकता होती. मुंबई ते सोलापूर येथे २४ तासांच्या आत ब्लड कर्करोगाचे औषध यशस्विपणे पाठविल्यानंतर मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट ट्रेन नसतांनाही, रेल्वे वाहतुकीच्या विविध टप्प्याने औषधे पोहोचविण्याची योजना बनवली होती. पार्सल बुकिंगनंतर दोन रूग्णांकरिता कर्करोगाची औषधे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन ते पुणे येथे विशेष पार्सल ट्रेनने तर पुण्याहून साता-याला कामगारांसाठी असलेल्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून नेण्यात आली होती. तिसर्‍या टप्प्यात श्रमिक विशेष गाडीच्या गार्डच्या डब्यातून सातारा येथून मिरजला नेले.चौथ्या टप्प्यात मिरज ते बेळगाव गूड्स ट्रेनमधील गार्डसच्या डब्यातून पोहोचविण्यात आले.

- Advertisement -

ट्विटरवरमुळे मदत करणे शक्य

ट्वीटरवरून औषधांच्या गरजेच्या अनेक विनंत्या करण्यात आल्या आहेत. संजय पात्रो यांनी मध्य रेल्वेला ट्विट केले आहे की त्यांचे सासरे आजारी आहेत आणि ओरिसाच्या कोरापट मधील जयपोर येथे आपत्कालीन औषधे तातडीने आवश्यक आहेत. बुकिंग झालेली औषधे कोणार्क एक्स्प्रेसने ब्रह्मपूर येथे पाठवली.

इथे केली होम डिलिव्हरी

  • मुंबई ते ब्रह्मपूर १६ जून २०२०
  • मुंबई ते बेंगलुरू (सिकंदराबाद – चेन्नई मार्गे) म्हैसूर २० में २०२०
  • मुंबई ते बेळगाव १८ मे २०२०
  • मुंबई ते बेळगाव २० मे २०२०
  • कांजूरमार्ग ते सोलापूर ११ मे २०२०
  • कळवा ते विन्हेरे (कोकण विभाग ) ०६ में २०२०
  • परळ ते वैभववाडी ०६ में २०२०
  • मुलुंड ते गोरखपूर १८ एप्रिल २०२०
माझ्या वडिलांना रक्ताच्या कर्करोगाच्या औषधाची तीव्र गरज असताना, भारतीय रेल्वेने जी सेवा दिली आहे त्याबद्दल मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मी भारतीय रेल्वेचा आभारी आहे. त्यांनी अशीच सेवा पुढे चालू ठेवली पाहिजे.
– श्रीधर माने, कर्करोगग्रस्ताचा मुलगा  
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -