घरमहाराष्ट्रसंविधान विरुद्ध मोदी अशी लढाई - छगन भुजबळ

संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई – छगन भुजबळ

Subscribe

आगामी लोकसभेची लढाई ही संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई असेल असे छगन भुजबळ यांनी सांगितले. आज राष्ट्रवादीकडून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली.

देशात महागाई, बेरोजगारी, नोटबंदी,जीएसटी आणि जातीयवाद यामुळे देशातील जनता अडचणीत आली असून लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी आगामी लोकसभेची लढाई ही संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई असेल असे छगन भुजबळ यांनी सांगितले. आज राष्ट्रवादीकडून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली. त्यानंतर आज भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापुढील काळात नाशिकमध्ये अनेक नवीन उद्योग आणि विकास कामे येण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नाशिक मतदारसंघाचे उमेदवार माजी खा. समीर भुजबळ, दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार मिळालेले माजी आ. धनराज महाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले भुजबळ

भुजबळ म्हणाले की,”राष्ट्रवादी व आघाडीतील मित्र पक्षांकडून उमेदवाराची घोषणा होण्याच्या आगोदरपासून गाव पातळीवर बूथ कमिट्याची रचना करण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होते. तसेच विविध गावांगावांमध्ये भेटीगाठी घेऊन जनतेची मते समजून घेत निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. आता उमेदवारीची घोषणा झाल्याने याला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील दोनही जागा विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सद्याचे सरकार हे संविधान विरोधी आणि जातीयवादी सरकार असल्याने सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन मतविभाजन टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली. मात्र काही पक्षांकडून ठोस भूमिका घेतली न गेल्याने ते सोबत येऊ शकले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत येण्याची त्यांची इच्छा नव्हती मतांचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे यावरून तरी दिसते आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. मात्र देशातील संविधान विरोधी व जातीयवादी सरकारला पायउतार करण्यासाठी काही नेते एकत्र येत नसतील तर मतदारांनी एकत्र येऊन आघाडी सोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे तसेच आपलं मत वाया जाणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -