युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणाी केले – चंद्राकांत पाटील

'भाजप-शिवसेना युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केले', असे वक्तव्य पालमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Maharashtra
chandrakant patil
पालमंत्री चंद्रकांत पाटील

‘भाजप-शिवसेना युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकादा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. भाजपाचे सर्व नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी युती धर्माचे पालन करावे. त्याचप्रमाणे जोमाने प्रचार करुन युतीचा उमेदवार खासदार केला पाहिजे,’ असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच यापुढे भाजपाविरोधात मातोश्रीपर्यंत तक्रार जाता कामा नये, असा इशार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकरत्यांची शुक्रवारी हॉटेल पॅव्हेलियमध्ये बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

उमेदवार कोणीही असो शिवसेनेचा प्रचार करायचा

कोल्हापूर मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण विभागाच्या स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. त्या दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडले होते याची आठवण करुन देताना पालमंत्री पाटील म्हणाले,’भाजप शिवसेना युतीचा खासदार निवडून येण्यासाटी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवार कोण आहे याचा विचार न करता शिवसेनेचा प्रचार करायचा आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युतीला आघाडी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून मदत मिळाली नाही, अशी कारणे न सांगता मिळेती साधने उपलब्ध करुन प्रचार करवा’, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीला आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, गोकुळचे संचालक बाबा देसाई, गोपाळराव पाटील, राहुल देसाई, मकरंद देशपांडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, अॅड. संपतराव पवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित आदी होते.


वाचा – तलाठी संवर्गाच्या १८०० रिक्त पदाची जाहिरात लवकरच निघणार – चंद्रकांत पाटील

वाचा – टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या बसविणार – चंद्रकांत पाटील


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here