फडणवीसांना कोरोनाची भीती नाही, मग मुख्यमंत्री घरी का? – चंद्रकांत पाटील

कोण म्हणतंय तुमचं सरकार पडणार आहे म्हणून…

Pune
chandrakant patil

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज फिरत आहेत. त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कसं चालेल? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. शिवाय ते मातोश्रीवरही कोणाला भेटत नाहीत, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे वांद्रे आणि गोरेगावला उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते पंढरपूरला गेले. या व्यतिरिक्त ते घराबाहेर पडलेच नाहीत. याशिवाय ते मातोश्रीवरसुद्धा कुणाला भेटत नाहीत. मग सरकार कसं चालेल? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला. यासह त्यांनी शरद पवारांच्या मोतोश्री भेटीवरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात त्यांना भेटायला जायला हवं.

कोण म्हणतंय तुमचं सरकार पडणार आहे म्हणून…

राज्यात सुरू असलेल्या सरकार अस्थिरतेच्या चर्चांवरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं. सरकार पाच वर्ष काम करेल या संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना पाटील म्हणाले, कोण म्हणतंय तुमचं सरकार पडणार आहे म्हणून…दोन मित्र अंधारातून जात असताना एकमेकांना धीर देतात. भूत बित काही नाही बरका! असंच सध्या चाललंय,” असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी राऊतांना काढला.


हेही वाचा – अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले नाहीत – संजय राऊत