Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गेंड्याच्या कातडीचं सरकार मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही - चंद्रकांत पाटील

गेंड्याच्या कातडीचं सरकार मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही – चंद्रकांत पाटील

मुंडेच्या कबुलीबाबत नैतिकतेच्या आधारावर पक्षाने विचार करावा; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणावर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनाम्याची मागणी करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला गेंड्याची उपमा दिली आहे. गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडी सरकार आत्मपरिक्षण करुन मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत राजनीम्याची मागणी केली आहे. “सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकिच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शआखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आम्हीही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन मुंडेचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -

मुंडेच्या कबुलीबाबत नैतिकतेच्या आधारावर पक्षाने विचार करावा – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या कबुलीबाबत नैतिकतेच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसने विचार करावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणातील सत्य बाहेर आणावं, त्यानंतर आम्ही आमची भमिका मांडू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“धनंजय मुंडे यांनी दिलेल्या कबुलीबाबत नैतिकतेच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसने विचार करण्याची आवश्यकता आहे. कायदेशीर बाब आहे. एक म्हणणं मुलीचं आहे आणि एक म्हणणं मंत्री धनंजय मुंडे यांचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी न्यायालयात गेलो आहे.न्यायालयाकडून स्थगिती घेतली आहे. आमची मागणी आहे की, संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी त्या संदर्भातलं सत्य जे आहे ते बाहेर आणलं पाहिजे. प्रकरणा संदर्भात पूर्ण सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

- Advertisement -