माधवराव गायकवाड यांच्याकडे लक्ष दिले नाही; सरकारची दिलगिरी

दोन्ह सभागृहाचे माजी आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन झालयानंतर सरकारने त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यास विलंब केला, याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली.

Mumbai
Revenue Minister Chandrakant Patil
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याबाबत धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला. सरकारने याबद्दल माफी मागावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली. यावेळी सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त करत याप्रकरणाची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत निवेदन करणार असल्याचे सांगितले.


कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन

 

आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माधवराव गायकवाड, उमेशा शंकर पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुंडे म्हणाले की, “माधवराव गायकवाड विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते होतेच त्याशिवाय ते विधानसभेचेही सदस्य होते. अशा ज्येष्ठ सदस्याचे निधन झाल्यानंतर प्रशासनाने पहिल्या ३० तासात त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधला नाही. ३० तास उलटून गेल्यानंतर सरकारने त्यांना निरोप दिला की आणखी दोन तास थांबा त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करु.”
सरकारने एका ज्येष्ठ सदस्याचा अवमान केला असून याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहीजे आणि ज्या अधिकाऱ्यांमुळे अंत्यसंस्काराला विलंब झाला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी लावून धरली.


विरोधक म्हणतात, ‘एकनाथ खडसे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’

 

चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. मात्र अजून कुणावर जर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायचे असतील तर त्याला मुख्यमंत्र्याची परवानगी लागते. मात्र निधनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री बीड दौऱ्यावर होते. ११ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्र्याकडून परवानगी मिळाली. मात्र तोपर्यत खूप उशीर झाल्याने त्यांच्या कुटूंबियांनी आधीच अंत्यसंस्कार केले. त्यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माधवराव यांच्याजागी वाजपेयी असते तर…

ज्या राज्यात श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतात त्याच राज्यात चळवळीच्या माध्यमातून लढा दिला. त्या कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्यासाठी तासनतास वाट पहावी लागते, ही शोकांतिका आहे. श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोणत्या अधिकाराखाली झाले हे सर्व बाबी कळायला हव्यात, अशी भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते विधानपरिषदेतील शोकप्रस्तावावर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माधवराव गायकवाड यांच्याबाबत जे खुलासे दिले जात आहेत, ते पटत नाही. आज सर्व सुविधा आहेत, तरी मुख्यमंत्र्याशी कसा कातय संपर्क झाला नाही? हे पटण्यासारखे नाही. माधवराव गायकवाड यांच्या जागी जर वाजपेयी असते तर असे झाले असते का? त्यामुळे याला जबाबदार असणारे संबंधीत अधिकारी आणि इन्स्पेक्टर जबाबदार आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.