‘शरद पवार यांच्यावर टीका करून चंद्रकांत पाटील हे बालिशपणा करत आहेत’

शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिशपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करत असल्याची टीका सोमवारी विरोधीपक्ष नेते धंनजय मुंडे यांनी केली आहे.

Pimpari-chinchwad
dhananjay munde
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिशपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करत असल्याची टीका काल, सोमवारी विरोधीपक्ष नेते धंनजय मुंडे यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, असा राजकीय इतिहास महाराष्ट्रात असल्याचे मुंडे म्हणाले.

'चंद्रकांतदादा पाटील बालिश' – धनंजय मुंडे

'चंद्रकांतदादा पाटील बालिश' – धनंजय मुंडे

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 23, 2019

त्यांना सत्तेची मस्ती 

धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभेनंतर भाजपा आणि शिवसेना हे फोडा फोडीचे राजकारण करत आहेत. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. चंद्रकांत पाटील यांना राजकीय व्यक्ती कोण संपर्कात आहे हे त्यांच त्यांना माहीत आहे. परंतु आमच्याही त्यांचे काही व्यक्ती संपर्कात असून ते आम्हाला माहीत आहे अस मुंडे म्हणाले. दरम्यान, यांचे अनेक ठिकाणी मतदारसंघ नाहीत ही दुर्दैवी बाब त्यांनी आधी कबूल करावी नंतर कोण तुमच्या संपर्कात आहे ते सांगावे. २२० जागा जिंकायच्या आहेत, असं म्हणत आहेत. परंतु आणखीन ही पाच वर्षे राज्यात आणि देशात सत्तेत राहून महाराष्ट्रात स्वतःची ताकद निर्माण करू शकला नाहीत, असा घणाघात मुंडे यांनी भाजपावर केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here