चंद्रपूर जिल्ह्यामधील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये ६ जण ठार झाले असून ६ जण जखमी झाल्याची माहित समोर आली आहे. जखमींना तात्काळ जवळील मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. मात्र, जखमींची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपुरमधील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.
Maharashtra: 6 dead and 6 injured in a collision between a car and a truck in Mul, Chandrapur. More details awaited. pic.twitter.com/QUzrU4MnQB
— ANI (@ANI) February 19, 2020
सहा जण जखमी
या अपघातात मृत्यू झालेल्यात तीन महिला, दोन पुरुष आणि एका दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये चालकांसह पाच महिलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातील सर्वजण चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरातील भोयर आणि पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. गोंदिया येथून देवर्दशनावरून परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
नेमके काय घडले?
चंद्रपूरच्या बाबूपेठमधील भोयर आणि पाटील कुटुंबातील सदस्य प्रतापगड येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनाहून परताना केसलाघाट ते नागाळा दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघाताची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत अपघातील जखमींना वाचण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत घटनेचा तपास केला असून ट्रकला भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा – कमल हासनच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; ३ ठार,१० जखमी