घरमहाराष्ट्रचंद्रपूरच्या सपना शूटरला अखेर ठोकल्या बेड्या

चंद्रपूरच्या सपना शूटरला अखेर ठोकल्या बेड्या

Subscribe

मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी युनिता टाक उर्फ सपना शूटर हिला अटक करण्यात अखेर चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. चंद्रपूर पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील नाहन येथून सपना शूटरला अटक केली. अटक केल्यानंतर आता तिला आठ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. सपनाच्या अटकेने मानवी तस्करीतील अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात आपल्या अंगणात खेळणार्‍या चिमुकलीचे अपरहरण करण्यात आले होते. 2010 साली मंदिराच्या परिसरातून 11 वर्षीय चिमुकलीचे गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आले होते. 2010 पासून अपहरण झालेल्या या चिमुकलीची नंतर ठिकठिकाणी विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. एवढचं नाही तर मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. चिमुकलीची एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात ठिकाणी विक्री करण्यात आली.

घरमालकाच्या सतर्कतेने बिंग फुटले
विक्री करण्यात आलेल्या मुलीवर विविध ठिकाणी अत्याचार झाले. खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तींनी तिचा हवा तसा वापर केला. सतत तिच्याशी शारीरक संबंध ठेवण्यात आले होते. येवढेच नाही तर तिच्याकडून विविध कामेही करून घेतली जात होती. धर्मवीर नावाच्या व्यक्तीने मुलीला खरेदी केले. ही मुलीची सातव्यांदा खरेदी होती. खरेदी केलेल्या धर्मवीरने मुलीला शहरातील एका खोलीत ठेवले. तिला ठेवण्यात आलेली खोली भाड्याची होती. मात्र मुलीच्या वर्तनाचा घरमालकाला संशय आला. त्यानंतर घरमालकाने मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर मुलीला झालेला सर्व प्रकार घरमालकाला सांगितला. घरमालकानें एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -