घरमहाराष्ट्रकेमिकल कंपनीत स्फोट

केमिकल कंपनीत स्फोट

Subscribe

१३ जणांचा मृत्यू,50पेक्षा जास्त जखमी

शिरपूर तालुक्यातील वाघाडी रस्त्यावरील केमिकल कंपनीत शनिवारी (दि.३१) सकाळी 10 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. आतापावेतो 13 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत गेल्याने घरांना हादरा बसला. शनिवारी स्फोटानंतर धुराचे लोट आकाशात पसरले. शिरपूर शहरापासून हा धूर दिसत होता. स्फोटाची माहिती कळल्याने नागरिक व पोलीस घटनास्थळी पोहोचले. या स्फोटाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, यांनी शिरपूरसह नरडाना, सोनगीरसह महामार्गावरील पोलीसांना घटनास्थळी पाठवल

धुळे, दोंडाईचा, शिरपूर येथील अग्निशमन दलाचे बंब आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापावेतो 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर ही माहिती उपलब्ध होणार आहे. आग केमिकलची असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. शिरपूर तालुक्यातील वाघाडी-बाळदे रस्त्यावर असलेल्या रुमित केमिकल या कंपनीत इथेनॉल व मिथेनॉल तयार केले जात होते.

- Advertisement -

या अतिज्वलनशील रसायन कंपनीत भयानक स्फोट झाला. यात 13 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जखमी झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली आहे. मृतांची ओळख पाठवण्याचे काम सुरू झाले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी आरोग्य विभागाच्या पथकाला नियुक्त केले आहे. घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी शिरपूर घटनास्थळी भेट दिली आहे.

या मृतांची ओळख पटली
पिनाबाई जितेंद्र पावरा (35, चांदसूर्या), रोशनी पावरा (14 चांदसूर्या), सुबिबाई रमेश पावरा (25 चांदसूर्या), पंजाबाई विशाल पावरा (25, वाकवड), रमेश सजन कोळी (35 वाघाडी) या मयतांची ओळख पटली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -