घरमहाराष्ट्रशिवसेनेने आधी बाळासाहेबांच्या स्मारकावर लक्ष द्यावं - भुजबळ

शिवसेनेने आधी बाळासाहेबांच्या स्मारकावर लक्ष द्यावं – भुजबळ

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधण्याच्या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधण्याच्या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधण्याचा दावा करत आहेत. दसरा मेळाव्यात देखील त्यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले होते. यावर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र शिवसेनेचा देव बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्ता असणाऱ्या सेनेने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यावर लक्ष दिले पाहिजे.”

मुंबई एज्युकेशन ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय शिक्षणासंदर्भात पालक आणि विद्यार्थी यांचा परिसंवाद मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांनी छगन भुजबळ यांना शिवसेनेच्या भूमिकेविषयी विचारल्यानंतर ते म्हणाले की, विकासाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी आल्यामुळेच राम मंदिराचा विषय पुढे आणला जात आहे. सध्या राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर राजकारण करणे, म्हणजे न्यायव्यवस्थेवर शंका उपस्थित करण्यासारखे असल्याची टीका भुजबळ यांनी केली.

- Advertisement -

हे वाचा – उद्धव ठाकरेंना अयोध्येचे निमंत्रण; दसऱ्यानंतर राम मंदिराची वीट रचणार?


भुजबळ पुढे म्हणाले की, सत्तेत असताना मागच्या चार वर्षात राम मंदिर का बांधून झाले नाही? तसेच शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकांची जागा घेण्याचा प्रयत्न करु नये. त्यांनी सत्ता सोडून मैदानात उतरावे, असे आव्हानच भुजबळ यांनी दिले.

- Advertisement -

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी शिवसेनेवर राम मंदिराच्या मुद्द्यावर टीका केली होती. ‘उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत, आधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधून दाखवावे’, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच ‘निवडणुका जवळ आल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण झाली’, असेही ते म्हणाले होते.


हे माहितीये का – राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाला हे करावे लागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -