घरमहाराष्ट्र'शेतकरी मागत आहेत चारा व छावण्या आणि सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या'

‘शेतकरी मागत आहेत चारा व छावण्या आणि सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या’

Subscribe

'शेतकरी मागत आहेत चारा व छावण्या आणि सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदी सराकारवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी डान्सबारवरील बंदी उठवली. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांजवळ जनावरांना देण्यासाठी चारा नाही, पाणी नाही. शेतकरी सराकरकडे चारा आणि छावण्या मागत आहेत. तर सरकार डान्सबार आणि लावण्या देत आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा पुण्याच्या मंचर-आंबेगाव येथे येऊन पोहोचली आहे. मंचर-आंबेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली. या जाहीर सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे आदींसह मंचर, शिरुर,जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

‘ही लढाई मोदी विरुद्ध संविधान’

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर बंदी आली आणि ज्याच्यावर बंदी होती त्या डान्सबारवरील बंदी उठवली. मग सरकारचे वकल काय करत आहेत?’, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘आजची ही लढाई मोदी विरुद्ध संविधान अशी सुरु आहे. कुणाला बोलायला, लिहायला बंधने लादली जात आहेत. खरे चित्र मांडायला दिले जात नाही. काल तेलतुंबडे या विद्वान व्यक्तीला अटक करण्यात आली. भाजपचा पदाधिकारी हत्यारासहीत सापडला त्याच्यावर कारवाई नाही. हे काय चाललंय हे लक्षात घ्या’.

- Advertisement -

‘सरकार पुन्हा मनुवाद आणत आहे’

१०० स्मार्ट सिटी बनवतो सांगितले परंतु चार वर्षे होवून गेली एकतरी स्मार्टसिटी बनवली का? हे दाखवा असे आव्हान आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला दिले. ते म्हणाले की, ‘गांधींजींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या गेल्या. ही कोणती मानसिकता आहे? हे सरकार पुन्हा एकदा मनुवाद आणत आहे. यापुढे ते म्हणाले की, ‘नोटाबंदीने आतंकवाद संपेल असे सांगण्यात आले. आतंकवाद संपला नाही, उलट अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपने एक मारा तो हम दस मारेंगे बोलणार्‍यांनी एक तरी मारला का? उलट आपले सैनिक शहीद होत आहेत’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -