घरमहाराष्ट्रभोपाळमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात धडाडणार भुजबळांची तोफ

भोपाळमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात धडाडणार भुजबळांची तोफ

Subscribe

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उद्या दि. ७ मे पासून मध्यप्रदेश दौऱ्यावर असून ते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभांना संबोधित करणार आहे. 

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणारतील मुख्य संशयित असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळांची तोफ भोपाळमध्ये धडाडणार आहे. नाशिकमध्ये लोकसभेसाठी प्रचार करताना छगन भुजबळ यांनी प्रज्ञा सिंह ठाकूरवर आपल्या भाषणातून टिका केली होती. विशेषत: मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या तत्कालिक एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भुजबळांनी त्याचा समाचार घेतला होता. प्रचाराची तीच ‘लाईन’ ते मध्यप्रदेशमध्येही लावून धरणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘माय महानगर’ला सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उद्या दि. ७ मे पासून मध्यप्रदेश दौऱ्यावर असून ते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभांना संबोधित करणार आहेतत्पूर्वी उद्या सकाळी ११.३० वाजता ते भोपाळ येथे पत्रकार परिषदेस संबोधित करणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या प्रचारार्थ नरेला विधानसभा येथे आयोजित सभेत संबोधित करणार आहे. तसेच भोपाळ दक्षिण पश्चिम विधानसभा राहुलनगर येथे आयोजित सभांसह काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी इतर सभांना संबोधित करणार आहे.

- Advertisement -

आपल्या राजकीय भाषणांबद्दल बुलंद तोफ म्हणून छगन भुजबळ प्रसिद्ध आहेतमुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यानंतर महिनाभरातच म्हणजेच डिसेंबर २००८ त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. त्यामुळे हल्ल्याशी संबंधित माहिती, तसेच मालेगाव मालेगाव बॉम्बस्फोट आणि त्यातील साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सहभागाबद्दल माहिती देऊन  भुजबळ मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसआघाडीच्या वतीने प्रचार करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -