घरमहाराष्ट्रराणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री वेळ देईनात!

राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री वेळ देईनात!

Subscribe

नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्याप वेळ देत नसल्याने या पुस्तकाच्या प्रकाशनास विलंब

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला विलंब होत आहे, या विषयीची माहिती ‘आपलं महानगर’च्या हाती लागली आहे. नारायण राणे यांच्या या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्याप वेळ देत नसल्यानेच या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन होऊ शकलेले नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मचरित्राची प्रकाशित होण्यापूर्वी काही पाने माध्यमांच्या हाती लागल्यानंतर अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करणारे हे राणेंचे आत्मचरित्र कधी प्रकाशित होणार? याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच नारायण राणे यांना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देत नसून राणेंच्या मनात असूनही या आत्मचरित्राचे प्रकाशन होऊ शकत नसल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

म्हणून मुख्यमंत्री राणेंना वेळ देईनात 

नारायण राणे यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंना वेळ देत नसल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घ्यायची नसून, नुकतीच युतीमधील भांडणे मिटून शिवसेना-भाजपा लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये देखील युती झाली आहे. त्यामुळे या युतीमध्ये कोणताच दुरावा पुन्हा येऊ नये याकरिता मुख्यमंत्री काळजी घेत असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नारायण राणे यांना हे आत्मचरित्र निवडणुकीआधी प्रकाशित करायचे असून, यासाठीच राणेंचे प्रयत्न सुरू आहेत.

काय आहे आत्मचरित्रामध्ये

दरम्यान राणेंच्या आत्मचरित्रांतील काही पाने माध्यमांच्या हाती लागली होती. या आत्मचरित्रामध्ये ‘जर नारायण राणे पक्षात राहिले तर मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ’ अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तसचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या मनात माझ्या बद्दल राग होता, कारण त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून मला त्या पदावर नेमण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले, असा दावा देखील या आत्मचरित्रामध्ये करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -