१०० देश, २० व्हिडिओ कॉन्फरन्स, चीन शिकवतोय जगाला धडा !

Mumbai
spoke person of china

करोनाचा विळखा आता १०० हून अधिक देशात घट्ट झालेला आहे. करोनाच्या लॉकडाऊनच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या चीनने आता आपल्या करोनाविरोधातील लढाईचा धडा जगाला शेअर करण्याची सुरूवात केली आहे. आपण कसे करोनाविरोधातील युद्ध जिंकलो यासाठीच चीनने जगातील १०० देशांसोबत आतापर्यंत संवाद साधला आहे. त्यासाठी २० कॉन्फरन्स घेताना चीनने १०० देशांसोबत आपल्या उपचार आणि निदानाच्या पद्धतींबाबतची माहिती शेअऱ केली आहे.

चीनने शेअर केला हा अनुभव

चीनने आतापर्यंत निदान आणि उपचार पद्धतीने ७ प्रोटोकॉल रिलिज केले आहेत. तर करोनाच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी आतापर्यंत ६ प्रोटोकॉल जाहीर केले आहेत. हे प्रोटोकॉल अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आले आहेत. आता चीन हे प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेसोबत तसेच आंतरराष्ट्रीय समुदायासोबत शेअर करत आहोत. तंत्रज्ञानाचे सहाय्य आणि सार्वजनिक हिताच्या अशा गोष्टींच्या माध्यमातून चीनने या संकटावर मात मिळवली अशी माहिती चीन सरकारच्या प्रवक्याने जाहीर केली आहे.