घरमहाराष्ट्रशटल सेवेसाठी नागरिक आक्रमक

शटल सेवेसाठी नागरिक आक्रमक

Subscribe

14 ऑक्टोबरला माथेरान बंद

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केलेली मिनी ट्रेन आणि शटल सेवा पूर्ववत करण्यासाठी माथेरानकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. नेरळ येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

गेले काही महिने मिनी ट्रेन बंद असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली असून, स्थानिक व्यवसायालाही जबर फटका बसला आहे. म्हणून ‘माथेरानची राणी’ अशी ओळख असलेली ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. याकरिता पक्षभेद विसरून स्थानिक नेते एकत्र आले आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी येथे श्रीराम चौकापासून सर्वपक्षीय रॅली काढण्यात येऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. २० ऑक्टोबरपर्यंत रेल्वे प्रशासनाने अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू केली नाही तर २१ रोजी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -