भविष्यासाठी युवाशक्ती अत्यंत महत्वाची – आ. योगेश टिळेकर

अमरावतीमध्ये सीएम क्रीडा चषक स्पर्धा सुरु आहे. अमरावती विधानसभा मतदार संघातील स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

amravati
Yogesh Tilekar
आमदार योगेश टिळेकर

मोबाईल आणि इंटरनेटच्या विळख्यात अडकलेला तरुण हा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मैदानावर येऊ शकतो त्यामुळे राज्यभरात भाजप सरकारला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने सीएम क्रीडा चषक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचं भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेशअण्णा टिळेकर यांनी अमरावती येथे सांगितले. अमरावती विधानसभा मतदार संघातील स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. तरुणाईला ऊर्जा देणाऱ्या सीएम क्रीडा चषक या उपक्रमातून नवा महाराष्ट्र घडेल असा विश्वासही आमदार टिळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

२५ लाख तरुण स्पर्धेत सहभागी

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, महापौर उपस्थित होते. राज्यात भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष पूर्ण झाली. या काळात सरकारतर्फे जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या असून युवकांसाठीही व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यातील २८८ मतदार संगनमध्ये सीएम क्रीडा चषक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. १५ नोव्हेंबर ते १२ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण ८ क्रीडा प्रकार व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. राज्यभरातून तब्बल २५ लाख तरुण या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे आमदार टिळेकर यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक क्षेत्रात योगदान

यावेळी क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक व खेळाडूं तसेच कला व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्याच्या सत्कार करण्यात आला. क्रीडा मार्गदर्शक एम. टी. देशमुख, विजय वैद्य, तुषार शेळके, दिलीप इंगोले, हनुमंत लुगे, मंगेश चांदूरकर, स्वाती बाळापुरे, पायल अजमिरे, क्रीडा मार्गदर्शक व कुस्ती प्रशिक्षक रणविरसिंह राहल, सांजली वानखडे, राधीका कडू, पूजा कोसे, शेखर ढवळे, तेजस्विनी दहिकर, नितीन नवाते, कौस्तुक बेणकर आदींना यावेळी गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here