घरमहाराष्ट्रसोलापूरात सीएम चषक स्पर्धा ७ डिसेंबरपासून

सोलापूरात सीएम चषक स्पर्धा ७ डिसेंबरपासून

Subscribe

सोशल मीडिया व नवनवीन व्हिडीओ गेममुळे तरुणाई मैदानी खेळापासून अलिप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सोशल मीडिया व नवनवीन व्हिडीओ गेममुळे तरुणाई मैदानी खेळापासून अलिप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्षा वृषाली चालुक्य यांनी दिली. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात १२ कला व क्रीडा स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आले आहेत. सोलापुरात होणाऱ्या स्पर्धांना शहरातील तिन्ही मतदार संघाचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक खेळांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे नाव देण्यात आले आहे. यात आयुष्यमान भारत क्रिकेट, स्वच्छ भारत कुस्ती, अटल पेन्शन जलतरण, मुद्रा योजना बुद्धिबळ, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, धावणे व कॅरम या खेळांबरोबरच चित्रकला व रांगोळीचा समावेश आहे.

स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा

शहर उत्तर विधानसभा : ९ डिसेंबर (सिध्देश्वर आखाडा, कुस्ती), १२ (पार्क स्टेडियम, क्रिकेट), १६ (सावरकर जलतरण तलाव, जलतरण), २३ (बसवंती मंगल कार्यालय, बुध्दीबळ).

- Advertisement -

शहर मध्य विधानसभा : ७ डिसेंबर (पुंजाल मैदान, बास्केट बॉल), ९ (मार्कंडेय जलतरण तलाव, जलतरण, १९ (पुंजाल मैदान, क्रिकेट).

शहर दक्षिण विधानसभा : ७ डिसेंबर (नेहरूनगर शासकीय मैदान, क्रिकेट). १४ (नेहरू नगर शिवाजी अध्यापक विद्यालय, व्हॉलिबॉल), १५ ( चित्रकला) १६ (रांगोळी, दोन्ही इंडियन मॉडेल स्कूल), १६ (नेहरुनगर शासकीय मैदान, १०० ते ४०० मीटर धावणे), २३ (पत्रकार भवन,कॅरम).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -