घरमहाराष्ट्र'गुंडाराज नको'; मुख्यमंत्र्यांचा गोटेंना इशारा

‘गुंडाराज नको’; मुख्यमंत्र्यांचा गोटेंना इशारा

Subscribe

धुळे महापालिकेने आपला हात भाजपच्या हातात दिला तर भाजप धुळ्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

धुळे महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहरात हजेरी लावली होती. शहरातील पांझरा नदीच्या किनारी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल गोटे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘‘  अशा धारधार शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं मत मांडलं. यावेळी  धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, याच सभेदरम्यान धुळे शहरातील अनेक प्रश्नांबाबत भाष्य करत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.

भाजप धुळ्याचा कायापालट करणार
सभेदरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, गेल्या अनेक वर्षांमध्ये धुळे शहराचा विकास झालाच नाही. शहराच्या विकासासाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने टक्केवारी खाल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मात्र, धुळे महापालिकेने आपला हात भाजपच्या हातात दिला तर भाजप धुळ्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. तसंच जे उमेदवार टक्केवारीची भाषा करत आहेत, त्यांना घरी पाठवून दिलं जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. आमची सत्ता गेली तरी चालेल पण टक्केवारीची भाषा करणाऱ्यांना आम्ही हुसकावून लावू, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘गुंडागिरी करणाऱ्यांना कायद्याच्या दंडाने ठोकून सरळ करेन’, असं म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आमदार अनिल गोट्यांवर निशाणा साधला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात कोणतं नवं वादळ उठणार का? हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -