घरमहाराष्ट्रजळगावातील केळी उत्पादकांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

जळगावातील केळी उत्पादकांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Subscribe

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. ठिबक सिंचनात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. या जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यात अधिकाधिक वाढ होण्यासाठी रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतच्या सुचना जिल्हा प्रशासनाला देण्यात येईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमात केले. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी बोलत होते.


या शेतकऱ्यांशी साधला संवाद

यावेळी जिल्ह्यातून प्रशांत नरेंद्र सरोदे, बामणोद, ता. यावल, अभय प्रभाकर महाजन, कोळवद, ता. यावल, गजानन कडू जंगले, येवती, ता. बोदवड, संदिप शिवाजी पाटील, फेसर्डी, ता. जळगाव, मधुकर पाटील, सुनसगाव, ता. जामनेर, अनंतराव पाटील, राजूरी, ता. पाचोरा या शेतकर्‍यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी सुनसगाव, ता. जामनेर येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे. बदलत्या वातावरणात शाश्वत उत्पादनाचा स्त्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी दिल्यात या सूचना

जिल्ह्यात रेशीम शेतीचे प्रमाण कमी असल्याने येथील शेतकरी रेशीम शेती करण्यासाठी उत्सुकता दाखवत नाही. शेतकर्‍यांनी रेशीम शेतीकडे वळावे, यासाठी त्यांना तांत्रीक स्वरुपाच्या माहिती सोबतच येणार्‍या उत्पादन विक्रीचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी रेशीम शेती कार्यालयाला प्रशासकीय मान्यता मिळावी. धागा निर्मिती प्रक्रिया केंद्र सुरु करणे, तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाटील यांच्या मागणी बाबत तात्काळ जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना लवकरात लवकर व्यवस्था करण्याची सूचना देण्यात येईल असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -