घरमहाराष्ट्र'भाजपच्या विजयाचे श्रेय मोदींसह गोपीनाथ मुंडे यांना जातं'

‘भाजपच्या विजयाचे श्रेय मोदींसह गोपीनाथ मुंडे यांना जातं’

Subscribe

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा सोमवारी पाचवा स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनानिमित्ताने बीडच्या गोपीनाथगड येथे भाजपकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गोपीनाथ मुंडे यांना दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतांनी विजय मिळाला. महाराष्ट्रात युतीच्या ४१ जागा निवडूण आल्या. भाजप आणि युतीच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांना दिले आहे. कारण गोपीनाथ मुंडे यांनी आमच्यासारखे नेते घडवले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा सोमवारी पाचवा स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनानिमित्ताने बीडच्या गोपीनाथगड येथे भाजपकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली होती. यासोबतच मराठवाड्यातील सर्व भाजप खासदार आणि भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘भाजपचे यश पाहून मुंडे साहेबांना स्वर्गात आनंदच होत असेल. मात्र, मुंडे साहेब नाहीत याचे आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. महाराष्ट्रातील लोकांनी भाजपला सर्वाधिक मतांनी निवडून दिले. लोकसभा निवडणुकीत युतीच्या ४१ जागा निवडूण आल्या. या यशाचे श्रेय निवडून आलेले खासदार जरी आम्हाला देत असले तरी याचे खरे श्रेय जाते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. या देशामध्ये मोदीजींनी ज्याप्रकारे गरीब कल्याण्याच्या योजना आणल्या, त्याप्रकारे लोकांना समजले की हे सरकार खऱ्या अर्थाने लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्यामुळे लोकांनी मोदी सरकारवर विश्वास ठेवला आणि भरघोस मतांनी पुन्हा निवडून आणलं. त्यामुळे न भुतो न भविष्य असे यश मिळाले. याचे श्रेय मोदीजींना जातेच, त्याचबरोबर याचे श्रेय गोपीनाथ मुंडेजींनाही जातं. कारण त्यांनी आमच्या सारखे नेते घडवले. नेतृत्व करण्याची क्षमता आमच्यात निर्माण केली. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये प्रचंड यश भाजपला मिळू शकलं.’

- Advertisement -

हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा’

‘पुढच्यावेळी आठही जागा मुंडे साहेबांच्या चरणी समर्पित करु’

‘मुंडे साहेबांचे स्वप्न होतं की मराठवाड्यातील सर्व खासदार भाजपचे असावे. यावेळी सात जागा आल्या. एक जागा फक्त चार हजार मतांसाठी गेली. मात्र, पुढच्यावेळी सर्व आठही जागा जिंकू आणि मुंडे साहेबांच्या चरणी सर्व आठ जागा समर्पित करु’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

‘मुंडे साहेबांनी सर्व सामान्य व्यक्तीत नेतृत्व उभारलं’

‘गोपीनाथ मुंडे यांच्याकडे चांगली नेतृत्व क्षमता होती. एक सर्वसामान्य व्यक्ती जरी त्यांना भेटला आणि त्यांचा परिस्पर्श झाला तरी त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता यायची. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला नेतृत्व करण्याचे काम मुंडे साहेबांनी केले’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -