मुख्यमंत्र्यांनी अटलजींचे आदेश पहावेत – प्रकाश आंबेडकर

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयावर बोलण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींचे आदेश पहावेत असे वक्तव्य केले आहे.

Mumbai
prakash ambedkar
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयावर बोलण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींचे आदेश पहावेत असे वक्तव्य केले आहे. इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलने केली आहेत.

हेही वाचा – RSS ची हत्यारे जप्त करा; अन्यथा देशात मोठा नरसंहार होईल – प्रकाश आंबेडकर

इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ताब्यात आली. इंदू मिल येथील स्मारकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असेल. दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. दरम्यान, चौथरा आणि पुतळ्याच्या उंचीवरुन वाद निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here