घरमहाराष्ट्रशिवसेनेला काडीची किंमत न देता ; मुख्यमंत्र्यांकडून नाणारचे गोडवे

शिवसेनेला काडीची किंमत न देता ; मुख्यमंत्र्यांकडून नाणारचे गोडवे

Subscribe

नाणारच्या प्रकल्पाला वाढता विरोध होत असताना आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची तळी उचलून धरायला सुरुवात केली आहे. नाणारला होणारा विरोध गैरसमजातून आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे म्हणणे आहे.

नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातील विरोधी पक्ष एकत्र होत असताना आणि शिवसेनेने ठाम विरोध दर्शवल्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणारचे गोडवे गायले आहेत. विरोधकांचा काहीतरी गैरसमज होतो आहे, असे सांगत फडणवीस यांनी नाणारची भलामण केली आहे.

हा प्रकल्प रेटण्यात आल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. उद्योगमंत्री आणि सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आल्याचा निषेध नोंदवत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. एकूणच नाणारने महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे सेनेच्या आमदारांनी काडीमोड घेण्याचा इरादा व्यक्त केला असताना नारायण राणे यांनीही सरकारला गंभीर इशारा दिला आहे. नाणार झाल्यास आपण खासदारकीचा विचार करणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले.

- Advertisement -

नाणार प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक

एकीकडे नाणारच्या प्रकल्पाला वाढता विरोध होत असताना आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची तळी उचलून धरायला सुरुवात केली आहे. नाणारला होणारा विरोध गैरसमजातून आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणार ही भाग्याची गोष्ट आहे. आपण चर्चेतून प्रश्न सोडवू, असे त्यांनी म्हटले आहे. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री नाणारचे गोडवे गात असताना तिथे खरेदी करण्यात आलेल्या जमिनींच्या घोटाळ्याबाबत मात्र ते एका शब्दानेही बोलत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -