घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री अहमदनगरमध्ये सभेला करणार संबोधित

मुख्यमंत्री अहमदनगरमध्ये सभेला करणार संबोधित

Subscribe

या सभेबाबतनगरकरांमध्ये उत्सुकता असून, मुख्यमंत्री नगरच्या सर्वांगीण विकासासाठीच्या एखाद्या योजनेचे संकेत देतात का, याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले आहे. आता प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असून भाजपच्या प्रचार मोहिमेची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेने होणार आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता गांधी मैदानात भाजपने ‘विराट विजय संकल्प सभे’चे आयोजन केले असून या सभेला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. नगर महापालिकेसाठी येत्या ९ डिसेंबरला मतदान होणार असून आतापर्यंतच्या प्रचारात भाजपचे अनेक महत्वाचे नेते सहभागी झाले आहेत. येत्या ७ डिसेंबरला खुद्द मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. विराट विजय संकल्प सभेत ते काय बोलतात याकडे नगरकरांचे तसेच विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे. आपल्या घणाघाती भाषणातून ते विरोधी पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाचा कसा समाचार घेतात. याबाबत नगरकरांमध्ये उत्सुकता असून, मुख्यमंत्री नगरच्या सर्वांगीण विकासासाठीच्या एखाद्या योजनेचे संकेत देतात का, याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही

विकास करताना भूमीपुत्रांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी- कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध राहू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी कल्याणमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “कोळीवाड्याची समस्या सोडविण्यासाठी मुंबईनंतर इतरत्रही कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी वेगळी विकास नियंत्रण नियमावली तयार करीत आहोत. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास असलेल्या समाजाची समृद्धी झाली तरच राज्याची समृद्धी होऊ शकते हे सरकारला माहीत आहे.


वाचा: अहमदनगरमध्ये कैद्यांसांठी सुरु झाले रेडिओ स्टेशन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -