वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’; मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही थकवले पाणी बिल

मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनीही मोठ्या रक्कमेने पाणी थकवले आहे.

Maharashtra
cm uddhav thackeray
वर्षा बंगला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचे साडेसात लाखांचे पाणी बिल थकले आहे. विशेष म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांनीच पाणी बिल थकवले नसून इतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांची ८ कोटी रुपयांची पाणी बिले थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे.

 

थकवलेले बिल ८ कोटीच्या घरात

एखाद्यावेळेस सामान्य मुंबईकरांनी पाण्याचे बिल थकवले तर महापालिकेकडून कठोर पावले उचलली जातात. अनेकदा पाणीही बंद केले जाते. मात्र, मुख्यमंत्र्यांसह इतर नेते मंडळींबाबत एक न्याय आणि लोकांबाबत एक न्याय महापालिका करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये पाणी बिल थकवले आहे. तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केली तर ती ८ कोटीच्या घरात जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिल थकलेले असून मुंबई महापालिका कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या मंत्र्यांनी थकवली बिल

 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्षा निवासस्थान थकबाकी ७ लाख ४४ हजार ९८१ रूपये
 • सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, देवगिरी निवासस्थान थकबाकी १ लाख ६१ हजार ५५ रुपये
 • विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री, सेवासदन निवासस्थान थकबाकी१ लाख ६१ हजार ७१९ रुपये
 • पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थानथकबाकी ३५ हजार ३३ रुपये
 • दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान थकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये
 • सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान थकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये
 • एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम, नंदनवन निवासस्थान थकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये
 • चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री, जेतवन निवासस्थान थकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये
 • महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी निवासस्थान थकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये
 • ज्ञानेश्वरी निवासस्थान – थकबाकी ५९ हजार ७७८ रुपये
 • सह्याद्री अतिथीगृह – थकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये


  हेही वाचा – नाशिकमध्ये पाणी टंचाईने घेतला चिमुरड्याचा बळी

  हेही वाचा – …यामुळे तीन दशकानंतर जाणवली ‘या’ गावात पाणी टंचाई