घरमहाराष्ट्रनाणार प्रकल्पविरोधी आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे!

नाणार प्रकल्पविरोधी आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे!

Subscribe

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतल्यानंतर पर्यावरण प्रेमींना मोठा दिलासा मिळाला होता. आता आणखीन एक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील मागे घेण्यात येणार आहेत. उद्धव ठाकरेंनीचच तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमींसाठी ही दुहेरी आनंदाची बाब म्हटली जात आहे. रविवारी उद्धव ठाकरेंनी आरे प्रकरणातील ३० आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता याचप्रमाणे ठिकठिकाणी आंदोलकांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शिवसेना-भाजप वादाचं कारण!

दरम्यान, नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मतभेद होते. भाजपकडून या प्रकल्पाला पाठिंबा दिला जात होता, तर शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता. प्रकल्प रद्द झाल्यानंतर देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रत्नागिरीमध्येच व्हायला हवा, असं जाहीर प्रचारसभेमध्ये बोलल्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर तातडीने नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisement -

नाणारच्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं समोर आलं होतं. ‘आपलं महानगर’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिल्यानंतर त्यावर विधिमंडळात गदारोळ झाला होता.


वाचा ‘ते’ वृत्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब; ही घ्या नाणारची जमीन खरेदी करणार्‍यांची नावे!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -