घरताज्या घडामोडीअहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला - उद्धव ठाकरे

अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – उद्धव ठाकरे

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात होते. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

१५ नोव्हेंबरला अहमद पटेल यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले होते. १ ऑक्टोबर अहमद पटेल यांनी स्वतः ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह  आढळलो आहे. मी आवाहन करतो की, जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःला आयसोलेटेड करा.’

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस पक्षाच्या पायाभरणीत पटेल यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -