घरताज्या घडामोडीठरलं! ७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

ठरलं! ७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

Subscribe

महाविकास आघाडीचे सरकारला १०० दिवस पुर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार अशी घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तारीख ठरली असून ते ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच या विषयात राजकारण होता कामा नये, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

अयोध्येच्या दौऱ्यात राहुल गांधींना सोबत घेणार का? असा प्रश्न भाजपकडून विचारला जात असल्याचे पत्रकारांनी सांगितले असता राऊत म्हणाले की, आम्हाला राहुल गांधींना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देणाऱ्यांनी मेहबुबा मुफ्तीला सोबत नेले होते का? असा आरोप संजय राऊत यांनी केला. सुप्रीम कोर्टात अयोध्येचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने त्याबाबत आनंद व्यक्त केला होता. तसेच पुर्वी देखील काँग्रेसने राम मंदिर व्हावे, अशी भावना प्रकट केली होती. त्यामुळे भाजपने आम्हाला सल्ले देऊ नयेत, त्याला आम्ही महत्व देत नसल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -