घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज - अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज – अशोक चव्हाण

Subscribe

जनतेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार येईल, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, संपूर्ण ताकदीनिशी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज आहे, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ५ नोव्हेंबर रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र, दि. १६ नोव्हेंबर विदर्भ व उत्तर महाराष्ट्र व शनिवार दि. १७ नोव्हेंबर रोजी कोकण विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह व काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता. संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र आहे. जनतेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार येईल असंही ते म्हणाले.

- Advertisement -

गुंतवणुकीत महाराष्ट्र पिछाडीवर

काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी युती सरकारवर टीका केली. युती सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -