घरमहाराष्ट्रपिंपरीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची राईसप्लेटसाठी चोरी

पिंपरीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची राईसप्लेटसाठी चोरी

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राईसप्लेट खाण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकावून मिळालेल्या पैशातून १५ दिवस राईसप्लेटचा आस्वाद घेतल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राईसप्लेट खाण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकावून मिळालेल्या पैशातून १५ दिवस राईसप्लेटचा आस्वाद घेतल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन असून त्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पर्समध्ये मिळालेले मोबाईल ५० रुपये आणि ५ हजार रुपयांना दोन्ही आरोपीने मित्राला विकले होते.

ज्येष्ठ महिलेची पर्स चोरली

सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी भोसरीमधून सुनीता शशिकांत कुलकर्णी या (वय ६३) वर्षीय ज्येष्ठ महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी हिसकावली होती. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने भोसरी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासात चोरी करणारे दोन्ही अल्पवयीन मुले असल्याचे समोर आले असून त्यांनी मौज मजा आणि राईसप्लेट खाण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

आरोपी भोसरी पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन दोन्ही आरोपी हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असून ११ वी आणि १२ वी वर्गात शिक्षण घेत आहेत. हे दोघे मित्र असून त्यांना मौजमजा आणि राईसप्लेट खाण्याची आवड होती. खिशात पैसे नव्हते म्हणून त्यांनी चोरी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकावली त्यामध्ये १६० रुपये आणि स्मार्ट फोन, साधा फोन होते, ते दोघांनी त्याचा मित्राला साधा फोन ५० रुपये आणि स्मार्ट फोन ५ हजार रुपयात विकला. मिळालेल्या पैशातून दोघांनी १५ दिवस राईस प्लेटचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी नवीन चप्पल आणि उरलेल्या पैशातून मौज मजा केली. परंतु ५ हजार रुपयांना ज्या मित्राला स्मार्ट फोन विकला होता. त्याने MPSC ची तयारी करत असलेल्या तरुणाला ७ हजार रुपयांना मोबाईल विकला. मोबाईल सुरू केल्यानंतर भोसरी पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या MPSC ची तयारी करत असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन विचारना केल्यानंतर सर्व घटना उलगडली आहे.याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपीना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -