घरमहाराष्ट्रऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकलसाठी हा येतोय नवीन कायदा!

ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकलसाठी हा येतोय नवीन कायदा!

Subscribe

ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकल कायदा २०२०चा मसुदा केंद्र सरकारने तयार केला आहे. या मसुद्यावर नागरिक संस्था आणि या क्षेत्रातील संबंधिताकडून सूचना आणि हरकती मागणीवण्यात आले आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि राज्याच्या महसूल वाढविण्याकरिता आता. ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकल कायदा २०२०चा मसुदा केंद्र सरकारने तयार केला आहे. या मसुद्यावर नागरिक संस्था आणि या क्षेत्रातील संबंधिताकडून सूचना आणि हरकती मागणीवण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच  ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकलसाठी हा येतोय नविन कायदा येणार आहे.

देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय परवाना प्रणाली अंतर्गत मालवाहू वाहनांच्या यशानंतर मंत्रालय, पर्यटक प्रवासी वाहनांची अखंडित हालचाल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उद्देशाने नवीन नियमांचा एक संच करण्यात आला असून, आतापासून याला “ ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईक  अधिकृत मंजुरी आणि परवाना नियम २०२० ” म्हणून ओळखले जाईल, यावर सामान्य नागरिक आणि हितधारकांशी सल्लामसलत करण्यासाठी १ जुलै २०२० रोजी जीएसआर ४२५ (ई) प्रकशित करण्यात आले आहे.एकिकडे राज्य सरकारांच्या महसुलात वाढ करण्यासोबतच देशातील राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यसाठी याला अजून महत्वाचा पल्ला गाठायचा आहे. परिवहन विकास परिषदेच्या ३९ व्या बैठकीतही याच विषयावर चर्चा झाली आणि राज्यातील सहभागींनी त्यांचे कौतुक करून त्याला सहमती दर्शविली होती. या नवीन योजनेंतर्गत कोणतेही पर्यटक वाहन चालक (ऑपरेटर) ऑनलाईन पद्धतीने ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकल  अधिकृत मंजुरी/परवाना” साठी अर्ज करू शकतात. अधिकृत मंजुरी / परवान्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर 30 दिवसांच्या आत नियमात नमूद केल्या नुसार सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर, अशा अधिकृत मंजुरी/परवान्यासाठी देशभरात लागू असलेले शुल्क जमा केल्यानंतर, अशा सर्व अधिकृत मंजुरी/परवाना जारी केल्या जातील.

- Advertisement -

 पर्यटनाला चालना मिळेल

याव्यतिरिक्त, या योजनेमध्ये जसे प्रकरण असेल त्यानुसार अधिकृत मंजुरी/परवान्याच्या स्वरुपात लवचिकतेचा समावेश करण्यात आला आहे, आणि हे तीन महिन्यासाठी किंवा एका वेळी बहुसंख्य, परंतु तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वैध नसेल. देशातील काही भागातील पर्यटनाचा मर्यादित हंगाम आणि ज्यांची आर्थिक क्षमता मर्यादित आहे, अशा चालकांचा विचार करून ही तरतूद समाविष्ट केली आहे. ही योजना केंद्रीय डेटाबेसचे एकत्रीकरण आणि सर्व अधिकृत मजुरी / परवान्यासाठी शुल्क प्रदान करेल. ज्यामुळे पर्यटकांची हालचाल सुलभ होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि अशा नोंदणीद्वारे मिळणारा महसूल वाढण्यास मदत होईल.सध्या अस्तित्वात असलेले सर्व परवाने त्यांच्या वैधते दरम्यान लागू होतील. आपल्या देशातील यात्रा आणि पर्यटन उद्योग गेल्या दहा-पंधरा वर्षात अनेक पटींनी वाढला आहे. या प्रगतीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही पर्यटकांचे योगदान आहे, तसेच त्यात उच्च अपेक्षा व ग्राहकांचा अनुभव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -