घरमहाराष्ट्रनोकरीवरुन हाकललं; मात्र पुन्हा बोलावलं

नोकरीवरुन हाकललं; मात्र पुन्हा बोलावलं

Subscribe

एचआयव्ही बाधित म्हणून नोकरीवरुन काढून टाकण्यात आलेल्या महिलेला पुन्हा तीन वर्षाने कामावर रुजू होण्यास सांगितले. अखेर या महिलेला कोर्टाने न्याय मिळवून दिला आहे.

एक महिला एचआयव्ही बाधित असल्याने त्या व्यक्तीला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल होतं. मात्र या महिलेने आपल्याला न्याय मिळावा म्हणून कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि अखेर तिला न्याय मिळाला आहे. ही घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. तीन वर्षाच्या संघर्षाने या महिलेला लेबर कोर्टाने पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिल्यानंतर या महिलेला पुन्हा नोकरी मिळाली आहे.


वाचा – संजय गांधी निराधार योजनेतून ४०० एचआयव्ही बाधितांना फायदा

- Advertisement -

अखेर पुन्हा मिळाली नोकरी

पुण्यातील एका महिलेला एचआयव्ही बाधित म्हणून नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. ही महिला एका कंपनीत गेले पाच वर्षे ट्रेनी ऑपरेटर म्हणून काम करत होत. मात्र अचानक महिला आजारी असल्याने तिच्यावर वैद्यकिय उपचार सुरु होते. या महिलेने आपण आजारी असून आपल्यावर उपचार सुरु असल्याचे कंपनीत सांगितले. त्यानंतर त्या महिलेने आपला मेडिक्लेम कंपनीत सादर केला. यामध्ये ही महिला एचआयव्ही बाधित असल्याचे उघड झाले. ही गोष्ट कंपनीच्या एचआरला समजली त्यानंतर त्यांनी या महिलेला राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. अचानक आणि कोणतीही पुर्वसूचना न देता. तसेच एचआयव्ही बाधित असल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याने या महिलेने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने महिलेला न्याय मिळवून दिला आणि कंपनीला पुन्हा एकदा महिलेला कामावर रुजू करुन घेण्याचे आदेश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -