महाराष्ट्रातील मलेरिया मृत्युंची त्रिपुराशी तुलना

राष्ट्रीय आरोग्य अहवालाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मलेरियामुळे झालेल्या मृत्युंमध्ये महाराष्ट्राची तुलना त्रिपुरा राज्यासोबत करण्यात आली आहे.

Maharashtra
mosquito
मलेरियाचा डास (प्रातिनिधिक चित्र)

एकीकडे महाराष्ट्रात होणारं आधुनिकीकरण, त्यासोबत बदलत जाणारी जीवनशैली आणि झपाट्याने होणाऱ्या व्यावसायिकीकरणामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण या सर्वांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अहवालाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राची तुलना त्रिपुरा राज्यासोबत करण्यात आली आहे. पण, मलेरियामुळे बळी गेलेल्या राज्यात छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे.

किटकजन्य आजारांतून होणाऱ्या मृत्युकडे दुर्लक्ष न करता किटकजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. इतर आजारातील बळींची संख्या कमी असल्याचे दाखवून राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते. पण, किटकजन्य आजारातील बळींची संख्या चिंता वाढवणारी आहे.
– डॉ. अभिजीत मोरे, जनआरोग्य, अभियान

राष्ट्रीय आरोग्य अहवालात गेल्या पाच वर्षांची आजारांतील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या देण्यात आली आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल अशी अनुक्रमे एक, दोन, तीन क्रमांकावरील राज्ये असून इतर आठ राज्यांमध्ये मलेरियामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मलेरियातील मृत्यूंची संख्या झपाट्याने खाली येत असली तरीही महाराष्ट्र राज्य यातील दुसऱ्या क्रमांकावर असल्याने वैद्यकीय अधिकारी खंत व्यक्त करत आहेत.

२०१८ – २०१९ मधील आकडेवारी

राज्य                          रुग्ण                        मृत्यू

छत्तीसगड                  ७७१४०                       २६
त्रिपुरा                       १३०७९                       १३
महाराष्ट्र                     १०७२६                       १३
पश्चिम बंगाल              २६३८२                       ११

हेही वाचा –

राज्यात महायुतीचे सरकार येण्याबाबत चंद्रकांत पाटील साशंक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here