Video: ‘मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मान’ भाजप नेत्याचे संतापजनक वक्तव्य

Mumbai
comparison of modi and shivaji maharaj
माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे संतापजनक वक्तव्य

भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी आज के शिवाजी, नरेंद्र मोदी हे पुस्तक लिहिल्यानंतर सुरु झालेल वाद अजुनही शमलेला नाही. भाजपवर जोरदार टिका झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुस्तकाशी भाजपचा संबंध नसल्याचे वक्तव्य केले. मात्र तरिही भाजपचे इतर नेते छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना योग्यच असल्याचे सागंत आहेत. भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी नुकतेच एका भाषणात सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी केलेली तुलना हा महाराजांचा सन्मानच समजायला हवा’. सुरेश हळवणकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

भाजप आमदार सुरेश हळवणकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

"मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना योग्यच" भाजपच्या माजी आमदाराचे संतापजनक वक्तव्य

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜನವರಿ 15, 2020

 

सुरेश हळवणकर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका जाहीर कार्यक्रमात भाषण करताना दिसत आहेत. हळवणकर म्हणाले की, “मी या पुस्तकाच्या लेखकाचे समर्थन करतो. मोदीजीची आधुनिक काळातील शिवाजी महाराज अशी तुलना करणे काही गैर नाही. उलट हा महाराजांचा सन्मान आहे. साडे तिनशे वर्षांनंतर महाराजांसारखी युद्धनिती, त्यांच्यासारखा जाणता राजा आपल्याला मिळाला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे शिवाजी महाराज म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये टाकण्याची कल्पना आजवर कुणालाही सुचली नव्हती, तसेच शेतकऱ्यांना आरोग्य विमा देण्याचे काम देखील मोदींनी केले आहे.”

हळवणकर यांनी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांचा हवाला देत जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाचे समर्थन केले आहे. यावर आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. कालच भाजपने या पुस्तकाशी आमचा काही संबंध नाही असे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here