घरमहाराष्ट्रप्रदेशाध्यक्षपदासाठी आता भाजपमध्ये चढाओढ!

प्रदेशाध्यक्षपदासाठी आता भाजपमध्ये चढाओढ!

Subscribe

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर देखील भाजपला सत्तेबाहेर रहावं लागल्यामुळे आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांची चर्चा आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

नवीन भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आता भाजपमध्ये चढाओढ लागली असून, या पदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांनी देखील लॉबिंग सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजप नेते विनोद तावडे यांचे नाव अग्रक्रमावर असून, तावडेंच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद निवडले जाणार आहे. राज्यात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता स्थापन न करता आल्यामुळे भाजप आता पक्ष संघटनेकडे लक्ष देत असून, राज्यात कार्यकर्त्यांची पसंती असलेला प्रदेशाध्यक्ष असावा अशी मागणी भाजपचे काही नेते करताना दिसत आहे.

चंद्रकांत पाटील यांचेही दिल्लीत लॉबिंग

सगळ्यात महत्वाचे म्हणजे रावसाहेब दानवे दिल्ली गेल्यानंतर त्यांच्याजागी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद हवे असून, यासाठी अमित शहा हे देखील पुढाकार घेत आहे. मात्र सध्या राज्यातील नेतृत्वाविरोधात पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी या ओबीसी नेत्यांना एकत्र आणणाऱ्या नेत्याची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

म्हणून विनोद तावडे यांचे नाव अग्रस्थानी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तावडे हे देखील इच्छुक असून, त्यांनाच प्रदेशाध्यक्ष करावे असा सूर भाजपमधील एका गटाचा आहे. त्याचे कारण म्हणजे विनोद तावडे यांना संघटना बांधणीचा अनुभव आहे. तसेच त्यांनी नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार यांच्याकाळात महामंत्री म्हणून काम केले आहे. एवढंच नाही तर तावडे यांना भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाचा देखील अनुभव असल्याने तावडे यांचे नाव चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -