घरमहाराष्ट्र‘महापोर्टल’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ

‘महापोर्टल’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ

Subscribe

‘महापोर्टल’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्यामुळे आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे.

सोमवारी हिंजवडी परिसरातील महापोर्टलचा कनिष्ठ लिपिकाचा पेपर होता. मात्र, पेपर सुरू असताना वीज गेली तसेच अनेकदा पेपर देत असलेले संगणक देखील बंद पडले. यामुळे हैराण झालेल्या परिक्षार्थींनी पेपरवर बहिष्कार टाकत ‘महापोर्टल’ विरोधात महाविद्यल्यालयीन परिसरात घोषणा बाजी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, संबंधित पेपर हा रद्द करण्यात आला असल्याची माहिती परिक्षार्थींनी दिली आहे.

संगणक बंद पडले आणि गोंधळ झाला

सविस्तर माहिती अशी, आज सकाळी १० ते १२ च्या दरम्यान, तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांचा महापोर्टलचा पेपर होता. यासाठी वेगवेगळ्या शहरातून परीक्षार्थी आले होते. साडेआठच्या सुमारास सर्व परीक्षार्थीं हिंजवडी परिसरातील एका महाविद्यालय केंद्रावर आले. दहाच्या सुमारास सर्व जण आत गेले ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. परीक्षार्थी पेपर सोडवण्यास बसले होते. मात्र, पहिल्या दहा मिनिटात तीन ते चार वेळा संगणक बंद पडले. पुन्हा लॉगिंन केले तरी ही संगणक सारखे बंद पडत होते. एकीकडे संगणक वारंवार बंद पडत होत होते तर दुसरीकडे उत्तर सिलेक्टकेल्यानंतर ती उत्तर लोड होत नव्हती, वेळ जात होता. तर अशातच वीज देखील गेली.

- Advertisement -

ऑनलाईन पेपर सुरू होऊन अर्धा तास उलटला मात्र, हा घटनाक्रम सुरूच होता. ही समस्या सर्व परीक्षार्थींना होत होती. त्यामुळे सर्व जण केंद्राच्या बाहेर आले. संतापलेल्या परीक्षार्थींनी महापोर्टलच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर एकमेकांचे प्रश्न देखील माहीत झाले त्यामुळे पेपर फुटल्याचे संशय परीक्षार्थींनी व्यक्त केला आहे. हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतर संबंधत प्रशासनाकडून आजचा पेपर रद्द करत लवकरच पेपर घेण्यात येईल. तसेच ते मेलद्वारे कळवण्यात येईल, असं सांगण्यात आले असल्याचे परीक्षार्थी योगेश घुगे यांने सांगितले आहे.


हेही वाचा – चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -