घरमहाराष्ट्रअयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा

Subscribe

काँग्रेस केली भूमिका स्पष्ट

आम्ही पक्षीय राजकारण व जनप्रदर्शनासाठी मंदिरात जात नाही. आस्थेने आत्मशुध्दीसाठी ईश्वरचरणी लीन व्हावे ही आमची भावना आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम त्याग, प्रेम, बलिदान, करुणा व समतेचे प्रतिक आहेत त्यांच्या दर्शनाने कोणाहीबद्दलचा द्वेष, तिरस्कार नाहीसा होतो व प्रेम सद्भावना जागृत होते. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केले होते. पण हे मंदिर कुठे व्हावे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हा विषय मिटला आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केली.

महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे जाहीर केले. राऊत यांच्या या विधानाच्या अनुषंगाने सचिन सावंत यांनी देखील ट्विटद्वारे काँग्रसेची भुमिका मांडली. मात्र त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सेनेला चिमटा काढत ‘आम्ही पक्षीय राजकारण आणि जनप्रदर्शनासाठी मंदिरात जात नाही. आस्थेने आत्मशुद्धीसाठी ईश्वरचरणी लीन व्हावे अशी आमची भावना आहे’, असे विधान सावंत यांनी केले. सावंत यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याबाबत काँग्रेस नाराज आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचेही अनेकजण राम मंदिरात जातील
मर्यादा पुरुषोत्तम राम हे त्याग, प्रेम, बलिदान, करुणा आणि समतेचे प्रतिक आहेत. त्यांच्या दर्शनाने कोणाही बद्दल द्वेष, तिरस्कार नाहीसा होतो व प्रेम सद्भावना जागृत होते. त्यामुळे जे अयोध्येत जातील त्या सर्वांच्या मनात करुणा आणि समाजातील सर्व वर्गांबाबत सद्भावना जागृत व्हावी अशी प्रार्थना करतो. यातच देशहित आहे. या प्रार्थनेसाठी काँग्रेसचे अनेक जण भविष्यात राम मंदिरात जातीलच, असेही सावंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -