घरमहाराष्ट्रमहाआघाडीचे आमदार भाजपमध्ये जाणार? विरोधकांना आमदार वाचवण्याची चिंता

महाआघाडीचे आमदार भाजपमध्ये जाणार? विरोधकांना आमदार वाचवण्याची चिंता

Subscribe

सतराव्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सपशेल पानिपत झाल्यानंतर आज सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चिंतन बैठक घेतली. या बैठकीत पराभवाची कारणे काय आहेत? यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, “भाजप आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही आमच्या आमदाराच्या संपर्कात आहोत. आमचे आमदार कुठेही जाणार नाही. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षाविरोधात काम केले ते सत्ताधारी पक्षासोबत गेले तर त्यात आश्चर्य नाही. आमचे निष्ठावंत आमदार आमच्या सोबतच आहे, असा ठाम विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

सलग दोन लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव झालेला आहे. यावेळी तर राष्ट्रवादीचे धैर्यशील माने, डॉ. भारती पवार यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकी मिळवली. तर काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे काही दिवसांतच भाजपवासी होणार आहेत. विखे पाटील हे आपल्यासोबत काही आमदार घेऊन जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच आता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेल्या आमदारांना पुन्हा सत्ता येण्याची चिंता लागून राहिल्यामुळे ते देखील भाजपची वाट धरू शकतात, ही भीती सध्या विरोधकांना वाटत आहे.

- Advertisement -

महाआघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा झाल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले. सर्व घटक पक्षांनी एकत्र यावे, यावरही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -