घरमहा @२८८काँग्रेसची चौथी यादी जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात आशिष देशमुख

काँग्रेसची चौथी यादी जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात आशिष देशमुख

Subscribe

विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. या चौथ्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात आशिष देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आशिष देशमुख यांचे नाव जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आशिष देशमुख विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यादीत एकूण १९ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत ५१, दुसऱ्या यादीत ५२, तिसऱ्या यादीत २० आणि चौथ्या यादीत १९ असे आतापर्यंत एकूण १४० उमेदवारांचा नावे जाहीर केली आहेत. याशिवाय ही यादी काँग्रेसची शेवटची यादी असल्याची ही चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत काँग्रेसकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजितबाबू देशमुख यांचे पुत्र आहेत. आशिष देशमुख यांनी भाजपात प्रवेश करुन २०१४ साली निवडणूक लढवली होती. यात त्यांचा विजय झाला होता. मात्र, २ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी भाजप सरकारवर नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून काटोल मतदारसंघाची जागा रिक्त आहे.


हेही वाचा – मनसेच्या तिसऱ्या यादीत ३२ उमेदवार घोषित; आतापर्यंत १०४ उमेदवार निश्चित

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -