घरमहाराष्ट्रकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपूरचा उमेदवार अखेर बदलला!

काँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपूरचा उमेदवार अखेर बदलला!

Subscribe

चंद्रपूरच्या वादग्रस्त जागेसह चार जागांवरच्या उमेदवारांची घोषणा काँग्रेसने नवव्या यादीमध्ये केली आहे. त्यामध्ये आधी जाहीर केलेला चंद्रपूरचा उमेदवार पक्षानं बदलला आहे.

महिन्याभरावर लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान येऊन ठेपलेलं असताना आता सगळ्याच पक्षांचे उमेदवार जवळपास अंतिम होत आले आहेत. काँग्रेसने आता उमेदवारांची नववी यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या चार जागांचा समावेश आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूरच्या जागेचा निर्णय असून तिथे काँग्रेसने आधीच्या यादीत जाहीर केलेला उमेदवार बदललेला आहे. स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा या उमेदवाराला विरोध होता. अखेर चंद्रपूरमध्ये नवीन उमेदवार देण्यात आला आहे.

राज्यातल्या ४ जागांची घोषणा

नवव्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अकोला, रामटेक, चंद्रपूर आणि हिंगोली या चार जागांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोल्यातून हिदायत पटेल, अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या रामटेकमधून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर आणि हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्याशिवाय बिहारमधील ३ जागा आणि जम्मू-काश्मीर, तामिळनाडूमधील प्रत्येकी एका जागेवरील उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, चंद्रपूरच्या जागेवरून स्थानिक काँग्रेसमध्ये बराच वाद झाला असून त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती.

यासंदर्भात काही स्थानिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. त्यासंदर्भात चर्चा करून आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेता हा उमेदवार बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला.

सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

- Advertisement -

अशोक चव्हाण म्हणतात, ‘मीच राजीनामा देणार आहे’!

चंद्रपूरमध्ये विनायक बागडेंना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नावाला स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे अशोक चव्हाण हैराण झाले होते. त्यातूनच ‘माझंच कुणी पक्षात ऐकत नाही, मी राजीनामा देणार आहे‘, असं बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मात्र, अखेर त्या उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -