घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

Subscribe

पालघर पोटनिवडणुकीचे वातावरण तापले

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पालघर येथील पोट निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना चांगला रंगला असताना आता काँग्रेसने देखील भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ पालघर जिल्हाधिका-यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. रविवारी २० मे, रोजी मुख्यमंत्र्यांच्या पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन जाहीर सभा झाल्या. यावेळी भाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा जाहीर केल्या असून, हा आचार संहितेचा भंग असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्या विरोधात आज तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणालेत सचिन सावंत

- Advertisement -

२० मे रोजी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या नालासोपारा आणि कासा येथे दोन जाहीर सभा झाल्या. या सभेमध्ये वसई विरार महापालिका हद्दीतून २१ गावांचा हरित पट्टा वगळू, पालघर जिल्ह्याला मेडिकल कॉलेज दिले जाईल, तसेच जुन्या काळातील सर्व खावटी कर्ज माफ करून नवीन कर्ज दिले जाईल अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. हा आचार संहितेचा भंग असून, याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून तात्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अजून गुन्हा दाखल होत नसल्याने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी पत्र दिले असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -