घरमहाराष्ट्रकाँग्रेस गाढवांचा पक्ष; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

काँग्रेस गाढवांचा पक्ष; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

Subscribe

सोलापूर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी 'काँग्रेस पक्ष हा गाढवांचा पक्ष आहे', अशी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पक्ष नेत आपल्या विरोधी पक्षावर टीकांचा भडीमार करताना दिसत आहेत. नुकतेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरमधील उमेदवार प्रकाश आंबेकर यांची रविवार सकाळी भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर भडकले असता त्यांनी ‘काँग्रेस पक्ष गाढवांचा पक्ष आहे’, असे म्हणत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

भेटीनंतर लावण्यात आले तर्क-वितर्क

दरम्यान, या संबंधीत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटी नंतर काँग्रेस राजकीय चर्चेला घडवून आणत गाढवपणा करणार हे माहित होत. मात्र, असे डावपेच करणाऱ्यांना लोक निवडणुकींमध्ये चांगलाच धडा शिकवतील. तसेच ‘काँग्रेस पक्ष गाढवांचा पक्ष आहे’, अशी टीका त्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे समजताच सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती.

- Advertisement -

सोलापूरात तिहेरी लढत

सोलापूर मतदार संघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात तिहेरी लढत रांगणार आहे. काँग्रेस पक्षाचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजप पक्षाकडून जयसिद्धेश्वर स्वामी रिंगणात उतरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -