हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील पोटनिवडणुकीत विजयी

अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीमद्ये अंकिता पाटील या १७ हजार २७४ मतांनी विजयी झाल्या आहेत.

Indapur
harshavardhan patil and daughter ankita patil

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये विजय झाला आहे. अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीमद्ये अंकिता पाटील या १७ हजार २७४ मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर काँग्रेसने अंकिता पाटील यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर २३ जून रोजी मतदान झाले.

अंकिता पाटील यांचा राजकारणात प्रवेश

पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीने म्हणजे अंकिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला. पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्याचे पुतणे म्हणजे हर्षवर्धन पाटील राजकारणात आले. त्यानंतर आता त्यांची मुलगी अंकिता राजकारणात प्रवेश करत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषद सदस्य होत्या. मात्र त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी काँग्रेसने अंकिता पाटील यांना संधी दिली.

अंकिता पाटील यांच्याबद्दल?

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचे शिक्षण परदेशामध्ये झाले. त्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. तसंच सध्या त्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे.

हेही वाचा – 

इंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात