घरमहाराष्ट्रकाँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा भाजपात प्रवेश

Subscribe

काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला आहे. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा कराड येथे आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्यजित देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित देशमुख यांचे भाजपात स्वागत केले.

हेही वाचा – …तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – उद्धव ठाकरे

- Advertisement -

सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. सत्यजित यांचे वडील आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांना भाजपात प्रवेशासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु होते. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख यांच्यावर अन्याय केला. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप त्यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -